दिनांक १४ जुलै २०२४,कोळगाव:
एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण बारा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राऊत उत्कर्षा शरद या विद्यार्थिनीने १४७ गुण मिळवत स्पेशल प्राईझ प्राप्त केले. १३५ गुण मिळवून मेहेत्रे जान्हवी अविनाश या विद्यार्थिनीने तालुका प्राईझ प्राप्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या स्पर्धा परीक्षांमध्ये एम.टी.एस ही परीक्षा सुद्धा महत्त्वाची गणली जाते. एम.टी.एस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. एन.एम.एम.एस, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पाठोपाठ आता एम.टी.एस परीक्षेतही रयत शिक्षण संस्थेच्या श्री कोळाईदेवी विद्यालयातील विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे. एम.टी.एस परीक्षेत उत्कर्षा शरद राऊत व जान्हवी अविनाश मेहेत्रे या विद्यार्थिनींना अनुक्रमे स्पेशल व तालुका प्राईझ प्राप्त झाले आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे, विभाग प्रमुख पाटोळे सर यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे, सर्व सेवक वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले आहे.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)






