दिनांक २३ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहर आणि परिसरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली. १ जून २०२३ ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तब्बल ७६०३ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून ५९ लाख ९७ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही मोहीम पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक शाखेचे अमलदार अजिनाथ जाधव आणि गोरख जाधव यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून नागरिकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.

- परवाना नसताना वाहन चालवणे (विदाऊट लायसन)
- वाहनावर क्रमांक नसणे (विदाऊट नंबर)
- ट्रिपल सीट प्रवास
- काळपट काचांचा वापर (ब्लॅक ग्लास)
- मोठ्या आवाजाचे सायलेंसर लावलेले बुलेट
- नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे
- बेदरपणे वाहन चालवणे
- अठरा वर्षाखालील मुलांकडून वाहन चालवणे
- इतर नियमभंगाच्या शेकडो प्रकारांवरही कारवाई

वाहतूक शाखेने नागरिकांना सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. “वाहतुकीचे नियम हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहेत, त्यांचे काटेकोर पालन करा, अन्यथा कठोर कारवाई होईल,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरात राबवलेल्या या कारवाईमुळे वाहतुकीत शिस्त येण्यास मदत झाली असून पुढील काळातही अशीच मोहिम सुरू राहणार असल्याचे ट्रॅफिक विभागाने सांगितले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Check out this shop on Meesho – https://www.meesho.com/HAMILTONSCIENCESPRIVATELIMITED?_ms=3.0.3
