श्रीगोंदा, दि. २५ ऑगस्ट २०२५ –
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पथकाने पेडगाव रोडवरील सोनवणे वस्तीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५२ लाख ३१ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, २२ जुगारींना अटक केली आहे. तर २ आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

👥 अटक आरोपी:
या कारवाईत श्रीगोंदा, कर्जत, आष्टी, बीड, पुणे या भागातील २२ जुगारींना अटक करण्यात आली. त्यात अय्याज अहमद शेख, सुनिल घोडके, सलमान हसन शेख, स्वप्नील राजू खेत्रे, युवराज दिनकर जाधव, गणेश सूर्यकांत डावरे, संजय पोपट वाल्हेकर, गहिनीनाथ रणसिंग, गणेश वैद्य, भाउसाहेब तोरडमल, भगवान शिंदे, शब्बीर पठाण, प्रमोद उदमले, सागर दिक्षीत, विश्वजीत काकडे, युनुस पठाण, भाऊ गोरे, संतोष साबळे, बाळु नवले, संदीप माने, गणेश वाळुंजकर, योगेश साळवे यांचा समावेश आहे.

फरार आरोपी: ताहीरखान पठाण (रा. पेडगाव) आणि भारत ओहळ (रा. ओहळ पिंप्री).
💰 जप्त मुद्देमाल:
- 💵 रोख रक्कम: ₹६६,२९०/-
- 📱 मोबाईल संच: ₹६,१०,५००/-
- 🚗 चारचाकी व दुचाकी वाहने: ₹४५,५०,०००/-
- 🎲 जुगार साहित्य: ₹५,०००/-
एकूण: ₹५२,३१,७९०/-

ही कारवाई मा. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सफौ भगवान गांगर्डे, पोहेकाँ आप्पा तरटे यांच्यासह श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या पथकाचा सहभाग होता.

२४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी स्वप्नील राजू खेत्रे हा श्रीगोंदा-पेडगाव रोडवरील सोनवणे वस्तीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये लोकांना एकत्र करून “तिरट” नावाचा हार जितीचा जुगार खेळ खेळवित असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ सापळा रचून पोलिसांनी धाड टाकत २२ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले, तर दोन आरोपी फरार झाले. घटनास्थळावरून रोकड, मोबाईल, वाहने आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोहेकाँ आप्पा तरटे करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)
