🚔 श्रीगोंदा पोलिसांची विशेष वाहतूक मोहीम — ३१ वाहनचालकांवर कारवाई, ₹५२,००० दंड वसूल 🚨

दिनांक ८ ऑगस्ट २०२५,श्रीगोंदा:

Whatsapp -> https://link.meesho.co/AtEx02Y5Cg (+919405270560)
Checkout this latest Smartphones
Product Name: Samsung Galaxƴ A23 5G Silver 6GB 128GB
Battery Capacity: 5000mAh
Battery Type: Lithium Ion
Brand: Samsung
Cellular Technology: 5G
Color: Silver
Connectivity Technology: Bluetooth,Wi-Fi
Connector Type: USB Type C
Display Type: LCD
Front Camera Resolution: 8MP
Generic Name: SmartPhone
Included Components: Handset, Type-C Data Cable, Travel Adapter, Quick Start Guide, Sim Ejection Pin
Internal Storage: 128GB
Item Model Number: SM-A236ELBGINS
Operating System: Android
Primary Camera Resolution: 50MP + 5MP
Processor Speed: 2 – 2.4 GHz
Product Weight: 197 g
Resolution: 2482 x 1080
Screen Size: 6.6 inch
SIM Card Size: Nano
SIM Card Slot Count: Dual SIM
Warranty: 1 Year

Country of Origin: India
Easy Returns Available In Case Of Any Issue
*Proof of Safe Delivery! Click to know on Safety Standards of Delivery Partners- https://ltl.sh/y_nZrAV3

श्रीगोंदा पोलिसांनी शहर व परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत विविध प्रकारचे गुन्हे आढळून आल्याने एकूण ३१ प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एकूण ₹५२,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक शाखेच्या पथकाने केलेल्या तपासणीमध्ये खालीलप्रमाणे उल्लंघन करणारे वाहनचालक आढळले —

1️⃣ बुलेट गाड्यांचे फटाके फोडणारे सायलेन्सर (५ प्रकरणे)

  • संबंधित बुलेट गाड्यांचे सायलेन्सर काढून टाकण्यात आले.
  • प्रत्येकी ₹१००० प्रमाणे एकूण ₹५००० दंड वसूल.

2️⃣ विना नंबर प्लेट (६ प्रकरणे)

  • वाहनांवर नोंदणी क्रमांक नसल्यामुळे एकूण ₹३००० दंड वसूल.

3️⃣ विना लायसन (२ प्रकरणे)

  • विना परवानाधारक वाहन चालविल्याप्रकरणी प्रत्येकी ₹५००० प्रमाणे ₹१०,००० दंड.

4️⃣ ट्रिपल सीट (५ प्रकरणे)

  • तिघांनी बसून दुचाकी चालविल्यामुळे प्रत्येकी ₹१००० प्रमाणे ₹५००० दंड.

5️⃣ ब्लॅक ग्लास (१३ प्रकरणे)

  • वाहनांवरील काळ्या रंगाचे टिंटेड ग्लास काढून टाकण्यात आले व ₹२४,५०० दंड आकारला.

या कारवाईत एकूण ३१ वाहनचालकांवर कारवाई करून ५२,०००/- दंड वसूल करण्यात आला. यावेळी ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ जाधव, पोकॉ मनोज साखरे, पोलीस कर्मचारी गोरख जाधव, वाहन चालक बबन साळवे यांनी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे कारवाई करताना.

श्रीगोंदा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालक बनावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

स्रोत: (श्रीगोंदा पोलीस)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading