आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेश संपर्क प्रमुख” पदी लक्ष्मीकांत राजे शिर्के यांची निवड.

दिनांक ८ ऑगस्ट २०२५,अहिल्यानगर:

भारतासह जागतिक स्तरावर मराठा हिताच्या दृष्टिने शिव-शंभुकार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ इतिहास मंचाच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेश संपर्क प्रमुख” पदी पेडगाव, किल्ले धर्मवीरगड येथील शंभुपत्नी महाराणी येसुबाईंचे तथा स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराव राजे शिर्के यांचे वंशज व इतिहास अभ्यासक श्रीमंत लक्ष्मीकांत गणपतराव राजे शिर्के यांची नुकतीच निवड करण्यात आली असून, नियुक्तीपत्र संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रदान केले आहे.

श्री. लक्ष्मीकांत राजे शिर्के हे गेल्या ३० वर्षांपासून गडदुर्ग संवर्धन, दुर्लक्षित वास्तव इतिहास प्रकाशात आणणे, चुकीच्या इतिहासाचे पुरावे देऊन आक्षेप खंडन करणे, मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाचा प्रचार-प्रसार करणे, विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे, युगपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, स्मृतीदिनांचे आयोजन तसेच ‘शंभुसेना’च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविणे अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

अलीकडेच त्यांनी इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिमत्व ‘शिवस्नुषा, शंभुपत्नी महाराणी येसुबाई’ यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या तारखांचा शोध घेऊन २७ जुलै रोजी राज्यभरात प्रथमच जयंती उत्सव सुरू केला. या मोलाच्या कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या इतिहास आघाडीने त्यांची महाराष्ट्र राज्य “प्रदेश संपर्क प्रमुख” पदावर निवड केल्याचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले व राष्ट्रीय अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नियुक्तीनंतर बोलताना राजेशिर्के म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ ही ऐतिहासिक वारसा जोपासणारी संघटना आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाई यांच्या तेजस्वी इतिहासाची जाणीव तरुणांना व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करावी, यासाठी आपण इतिहास आघाडीच्या माध्यमातून मराठा समाजाचे संघटन वाढविण्यासाठी आणि गडकिल्ले संवर्धनासह विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू.”

Check out this shop on Meesho – https://www.meesho.com/nhbzc?_ms=3.0.3

लक्ष्मीकांत राजे शिर्के यांच्या नियुक्तीबद्दल संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एम. के. बी. एन. आर. सागर, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल, आंतरराष्ट्रीय सचिव चैतन्य रावल, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हेमंत सरकार, आंतरराष्ट्रीय इतिहास आघाडी अध्यक्ष व्याख्याते रवींद्र जगदाळे, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अमरसिंह जाधवराव, आंतरराष्ट्रीय सचिव उज्वलसिंह गायकवाड, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष इंद्रजीत घोरपडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, महिला आघाडी आंतरराष्ट्रीय अध्यक्षा किरण शेखावत, महिला आघाडी भारत राष्ट्रीय अध्यक्षा कोकीळा पवार, राष्ट्रीय उपाध्यक्षा महिला आघाडी शिवशंभू प्रिया जांभळे, इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र निंबाळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भैय्या कुर्मी, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रताप भोसले, महाराष्ट्र राज्य निरीक्षक व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष भानुदास वाबळे पाटील यांसह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Whatsapp -> https://link.meesho.co/ANE4XN-UKg (+919405270560)
Catalog Name:Nothing Phone (3a) Pro 8GB 256GB Black
Battery Capacity: 5000mAh
Battery Type: Lithium Ion
Brand: Nothing
Cellular Technology: 5G
Color: Product Dependent
Connectivity Technology: Bluetooth, Wi-Fi
Connector Type: USB Type C
Display Type: Flexible AMOLED
Front Camera Resolution: 50MP
Generic Name: Mobile Phone
Included Components: Nothing Phone (3a) Pro, Nothing Cable (c-c) 100 cm, Phone (3a) Pro screen protector (pre-applied), SIM tray ejector tool, Safety card
Internal Storage: 256GB
Item Model Number: Product Dependent
Operating System: Android
Primary Camera Resolution: 50 MP + 50 MP + 8 MP
Processor Speed: 2.5 GHz & Above
Product Weight: 211 g
Resolution: 2392 x 1080
Screen Size: 6.77”
SIM Card Size: Nano
SIM Card Slot Count: Dual SIM
Warranty: 1 Year
Dispatch: 2 Days

*Proof of Safe Delivery! Click to know on Safety Standards of Delivery Partners- https://ltl.sh/y_nZrAV3

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading