चोराचीवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी तुकाराम चव्हाण (दादा), व्हा. चेअरमनपदी सविता साळुंके यांची बिनविरोध निवड.!

दिनांक: १ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:

तालुक्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी चोराचीवाडी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली. पाचपुते समर्थक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत बाजी मारत, चेअरमनपदी श्री. तुकाराम (दादा) नामदेव चव्हाण तर व्हा. चेअरमनपदी सौ. सविता संतोष साळुंके यांची बिनविरोध निवड केली.

श्री. तुकाराम चव्हाण (दादा) हे पंचक्रोशीत परिचित असून त्यांच्या अनुभवाचा फायदा सोसायटीला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे, सौ. सविता साळुंके यांच्या रूपाने एका महिला सदस्याला उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्याने महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळाले आहे.

या बिनविरोध निवडीमुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये आणि सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

याबद्दल नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांचे माजी मंत्री बबनदादा पाचपुते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, राजूदादा नागवडे, रमेश तात्या गिरमकर यांच्यासह चोराचीवाडी, भिंगान आणि नवनाथ नगर सोसायटी सभासद यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी विकासाचे नवे पर्व सुरू करेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

https://www.amazon.in/dp/B0FDL54NGG/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_7WHYVSNZT5GQ27ZRQ64D?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=9325624ee43ccb825f7d4c245b87778a
Samsung Galaxy Z Fold7 5G Smartphone with Galaxy AI (Silver Shadow, 12GB RAM, 512GB Storage), Ultra Sleek Design with 200MP Camera, Powerful Snapdragon 8 Elite, Google Gemini

निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन तुकाराम चव्हाण (दादा) यांनी सोसायटीच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि सभासदांच्या हितासाठी प्राधान्याने काम करणार असल्याची ग्वाही दिली.

व्हा. चेअरमन सविता साळुंके यांनी देखील पारदर्शक कारभारावर भर देत, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मानस व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण निवडीमुळे चोराचीवाडी सोसायटीचे कामकाज अधिक गतीमान होऊन शेतकरी व सभासदांच्या अडचणी त्वरित सोडवण्यास मदत होईल, अशी आशा सर्वसामान्य सभासदांकडून व्यक्त होत आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र).

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading