गरजवंत थैलेसिमिया रुग्णांकरिता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
दिनांक १ नोव्हेंबर २०२५ श्रीगोंदा:
गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारे, गोरगरीब जनतेला आपलेसे वाटावे असे व्यक्तिमत्व म्हणजे श्रीगोंदा नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे. त्यांचा २ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न करता, समाजाशी बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधत, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील थैलेसिमिया बाल रुग्णांसाठी सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने, त्यांच्यासाठी खास भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून, गरजवंत मुलांचे प्राण वाचवावेत आणि समाजसेवा घडावी ही त्यांची प्रामाणिक सदभावना आहे.

आयोजन स्थळ श्री शनी मंदिर, श्रीगोंदा येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत नगर येथील जनकल्याण रक्तपेढीने १५० थैलेसिमिया बालकांना दत्तक घेतले आहे, ज्यांना दर १५ दिवसांनी रक्ताची गरज भासते. दिवाळी सणामुळे रक्तपेढीतील रक्तसाठा खूप कमी झाला असून, या मुलांना वेळेवर रक्त न मिळाल्यास त्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या मुलांसाठी हे रक्तदान शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे.

Samsung Galaxy S25 Ultra 5G Smartphone with Galaxy AI (Titanium Black, 12GB RAM, 512GB Storage), Titanium Frame, Snapdragon 8 Elite, 200 MP Camera with ProVisual Engine and 5000mAh Battery
नानासाहेब कोथिंबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सात वाजता साळवनदेवीचे दर्शन घेऊन शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन पूजन आणि प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये श्री केणे मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर (मेन रोड), श्री संत शेख महंमद महाराज मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री शनी मंदिर, श्री राम मंदिर अशा विविध धार्मिक स्थळी विधिवत पूजा केली जाईल.

तसेच, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज प्रयत्न करणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांचा यथोचित गौरव करून त्यांना कपडे वाटप आणि मिठाई वाटप करण्यात येईल.
अशी माहिती काल आयोजित पत्रकार परिषदेमार्फत देण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी बापूशेठ (तात्या) गोरे, आदिक वांगणे, धनुभाऊ कोथिंबीरे, नानासाहेब कोथिंबीरे आणि आरिफ भाई मलाजप्ते उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार परिषद)
