दिनांक २९ एप्रिल २०२६ श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विनाकारण व्यत्यय आणणाऱ्या काही जणांना नेत्याने स्पष्ट शब्दात सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे.

“ग्राउंड रिपोर्ट” आणि वस्तुस्थितीची माहिती नसताना केवळ लुडबुड करण्यासाठी आलेल्यांना नेत्याने त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.
तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी मूळ मुद्द्यांना बगल देऊन हेतुपुरस्सर आणि अवाजवी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

यावेळी नेत्याने कठोर भूमिका घेत अशा व्यक्तींना सज्जड दम भरला. उपस्थित असलेल्या इतरांनीही यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण हा प्रकार पत्रकारितेच्या चौकटीबाहेर जाऊन केवळ गोंधळ घालण्यासाठी केला जात असल्याचे उपस्थितांना जाणवले.
या संदर्भात संबंधित नेत्याच्या निकटवर्तीयांनी माहिती दिली की, “ज्यांना कठोर शब्द वापरण्यात आले, ते मुळात अधिकृत पत्रकार नाहीत. पत्रकार परिषदेचे पावित्र्य न राखता केवळ अडथळे निर्माण करणे आणि कोणत्याही अभ्यासाशिवाय प्रश्न विचारणे हा त्यांचा उद्देश होता. अशा लोकांमुळे चर्चेचा मुख्य उद्देश भरकटत असल्याने त्यांना शिस्त लावणे गरजेचे होते.” असे त्यांनी सांगितले.

संबंधित व्यक्तींचा इतिहास आणि त्यांचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ आधीच घेण्यात आला होता, असेही नेत्याच्या सहकाऱ्यांनी स्पष्ट केले. “जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये पत्रकारितेचा एक दर्जा राखला जातो, मात्र येथे काही जण केवळ गोंधळ घालण्यासाठी येतात. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठीच नेत्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली,” असेही त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
स्रोत:(अधिकृत माहिती नुसार)
AI चा वापर करून फोटो तयार करण्यात आला आहे.















Leave a Reply