श्रीराम मल्टीस्टेटच्या पंचवार्षिक निवडणुकीत विश्वास नागवडे चेअरमन आणि विजय खराडे व्हा. चेअरमन म्हणून बिनविरोध निवड..

श्रीगोंदा दिनांक २५ जुन २०२५:

श्रीगोंदा तालुक्यातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या श्रीराम मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. वांगदरी (महाराष्ट्र व कर्नाटक) यांची सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये श्री. नागवडे विश्वास भुजंगराव यांची चेअरमन, तर श्री. खराडे विजय लक्ष्मण यांची उपाध्यक्ष (व्हा. चेअरमन) पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.

दिनांक २४ जून २०२५ रोजी संस्थेच्या कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक निबंधक एन. ए. परजणे, अभिमन्यू थोरात व मुढे एन. बी. हे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक नागवडे दीपकशेठ शिवाजीराव तसेच नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र (दादा) नागवडे होते.

संचालक मंडळाच्या या निवड प्रक्रियेत चेअरमनपदी श्री. नागवडे विश्वास भुजंगराव आणि व्हा. चेअरमनपदी श्री. खराडे विजय लक्ष्मण यांची बिनविरोध निवड झाल्याने संस्थेच्या सर्व सभासदांनी आनंद व्यक्त केला. निवडीनंतर संस्थेच्या वतीने एका सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक सदस्यांचे –
नागवडे आदेश भुजंगराव, पवार प्रवीण दादासाहेब, कापडे सचिन अरुण, शिर्के प्रवीण रंगनाथ, तावरे प्रदीप प्रकाश, उदमले अभंग विलास, नागवडे सौरभ बाळासाहेब, सौ. नागवडे माधुरी आदेश, सौ. हराळ ज्योती संदीप यांचा राजेंद्र (दादा) नागवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दातीर संतोष रावसाहेब यांनी केले, तर सभासदांचे आभार डोळस विनोद विठ्ठल यांनी मानले.

संस्थेची ही निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पडल्याबद्दल आणि नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून संस्थेचा व्यवसाय व कार्यक्षेत्र अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading