नाशिक ACB ची धडाकेबाज कारवाई – सहाय्यक फौजदारासह खाजगी इसम लाच घेताना रंगेहात अटक.

दिनांक २२ ऑगस्ट २०२५, अहिल्यानगर:

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक युनिटने यशस्वी सापळा रचून १.५० लाख रुपये लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे (वय ५७) व खाजगी इसम अशोक रामचंद्र गायकवाड (वय ७१) यांना रंगेहात पकडले.

तक्रारदारास गांजाच्या प्रकरणात आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी दोघांनी मिळून ५ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर १.५० लाख रुपये निश्चित झाले. दिनांक २१ ऑगस्ट रोजी सापळा कारवाईदरम्यान गायकवाड यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताच त्यांना पकडण्यात आले.

दोन्ही आरोपींवर तोफखाना पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकांना आवाहन: कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम लाच मागत असल्यास तात्काळ एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Check out this shop on Meesho – https://www.meesho.com/aspll?_ms=3.0.3

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading