दिनांक ८ एप्रिल २०२५,धाराशिव:
प्रतिनिधी/पत्रकार समाधान महाराज नाडकर..
धाराशिव येथील लहुजी शक्ती सेनेच्यावतीने सुप्रसिद्ध तृतीयपंथी कीर्तनकार समाधान महाराज नाडकर (जगवाले) यांचा सत्कार करण्यात आला. ‘निर्भिड कलम : आपली बातमी, आपला आवाज’ या चॅनलसाठी प्रतिनिधी म्हणून समाधान महाराजांची निवड झाल्याच्या निमित्ताने त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे म्हणाले, “समाधान महाराजांचा अध्यात्मिक अभ्यास अत्यंत सखोल आहे. ते महाराष्ट्रभर कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. आता ‘निर्भिड कलम’ च्या माध्यमातून ते समाजातील सामान्य जनतेचा आवाज बनून न्याय मिळवून देतील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.”

समाधान महाराज नाडकर (जगवाले) यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “ही जबाबदारी मी मनापासून स्वीकारत असून, समाजातील उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी सदैव आवाज उठवत राहीन,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास लहुजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष संतोष मोरे, प्रा. रवी पोवळे, प्रा. स्वप्निल वाकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.

स्रोत:(पत्रकार समाधान महाराज नाडकर)

Advertise..
