अहिल्यानगर, दि. १३ जुलै २०२५ (मनिषा घोडके):
सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्याचा प्रेरणादायी उपक्रम आज अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यशवंत सेना अहिल्यानगर व जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२५ आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माधवजी गडदे (सरसेनापती, यशवंत सेना, महाराष्ट्र राज्य) होते. प्रमुख पाहुणे म्हणून कांतीलाल जाडकर (शहराध्यक्ष, यशवंत सेना, अहिल्यानगर), विजय तमनर (जिल्हाध्यक्ष, यशवंत सेना, अहिल्यानगर) हे उपस्थित होते. तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पोकळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गलांडे, ज्ञानदेव भैलुमे, प्रशांत चव्हाण सर, व राज्य व जिल्हा पातळीवरील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

कार्यक्रमात श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अनिल ठवाळ, पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार चंदन घोडके व पत्रकार आप्पासाहेब चव्हाण, तसेच सामाजिक कार्यकर्ते नारायण क्षीरसागर, सुरेश गलांडे व ज्ञानदेव भैलुमे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याबरोबरच राज्यभरातील इतर अनेक मान्यवरांनाही त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना सरसेनापती माधवजी गडदे यांनी, “राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श समाजासाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या जयंती दिनानिमित्त आम्ही समाजातील खर्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाला दाद देत आहोत,” असे सांगितले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन करत पुढील सामाजिक कामासाठी यशवंत सेनेच्या माध्यमातून पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Advertise…
