लोणीव्यंकनाथ मध्ये भुमीपुत्रांचा सन्मान…

दिनांक २ जून २०२६ श्रीगोंदा:

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व अग्नीपंख फौडेशन लोणी व्यंकनाथ येथील भारतीय सैन्य दलातील जवान सेवानिवृत्त शिक्षक,  भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान, शिक्षक अधिकारी व भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या जवान यांचा उत्कृष्ट कामगिरी व यशाबद्दल  गौरव केला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपसभापती गणपतराव काकडे होते.

भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान नितीन काकडे, शिक्षक डी आर काकडे, रामदास साळवे, राजाराम गायकवाड, रामदास फटाकडे,  अधिकारी शिवाजी जाधव तसेच  सैन दलात भरती झालेला जवान अर्जुन धोत्रे यांचा सन्मान हा सन्मान सरपंच मनीषा नाहाटा, जगताप, उपसरपंच चित्राताई धाकड, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव बापु मगर,  सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी अध्यक्ष लालासाहेब काकडे, गोरख ओव्हळ यांचे हस्ते करण्यात आला.

प्रास्ताविक राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी केले. यावेळी गणपतराव काकडे मधुकर पवार दिलीप काकडे डी आर काकडे शिवाजी जाधव राजाराम गायकवाड यांची भाषणे झाली. यावेळी राजेंद्र कुंदांडे एम डी खंडागळे बंडू खंडागळे भास्कर कुंदांडे लियाकत तांबोळी सदाशिव खंडागळे हनुमंत मगर राहुल गोरखे उपस्थित होते सुत्रसंचलन गणेश गायकवाड यांनी केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading