दिनांक २ जून २०२६ श्रीगोंदा:
तालुक्यात आणि परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांनी मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मे महिना आणि १ जून रोजी घेतलेल्या विशेष शोध मोहिमेत पोलिसांनी जुगार आणि बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर जोरदार कारवाई केली.
या संयुक्त मोहिमेत एकूण ८४ ठिकाणी छापे टाकून सुमारे ३६ लाख २२ हजार २४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या विशेष पथकाने केली आहे.
पोलिसांनी १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत श्रीगोंदा, बेलवंडी आणि मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी छापे टाकले. यामध्ये अवैध दारू विक्री विरोधात ६० कारवाया करून ६० आरोपींना ताब्यात घेण्यात आले व २ लाख ९१ हजार ०७३ रुपयांची दारू जप्त व नष्ट करण्यात आली.

तसेच, मटका व जुगार अड्ड्यांवर ७ ठिकाणी मोठी छापेमारी करण्यात आली. यात तब्बल ३२ लाख ६४ हजार ३७० रुपयांच्या मुद्देमालासह २५ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध धंदे चालवणाऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी १ जून रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत एकाच दिवशी १७ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १७ आरोपींवर १७ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एकाच दिवसात ६६ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण छापेमारी: ८४ ठिकाणे.., एकूण कारवाई झालेले आरोपी: ८५ जण, जप्त/नष्ट केलेला एकूण मुद्देमाल: रु. ३६,२२,२४८/-

या धडक कामगिरीत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह सपोनि गणेश अहिरे, पो.उप.नि. सचिन लिंमकर, संजय वाघमारे, पवन मोहिते, भगवान गांगर्डे, तसेच पोलीस अंमलदार अप्पा तरटे, अविनाश काटकर, संभाजी वाबळे, अभय काळे, संभाजी शिंदे, नितीन गाडगे, उद्धव दिंडे, संग्राम जाधव, गणेश गाडे, सचिन वारे, संदीप जाधव, संदीप राऊत, महादेव कोहक, निखिल मसराम, मयूर तोरडमल, राजेश जाधव, अमोल मरकड, संभाजी गर्जे, वैजीनाथ कुटे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी व्यवहारे आदींच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे तालुक्याभरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.
स्रोत:(प्रेस नोट)











Leave a Reply