मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४: ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची संधी..

दिनांक २ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील ६५ वर्षे आणि त्यावरील वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सूचना देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत “मुख्यमंत्री वयोश्री योजना – २०२४” ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील सुविधांसाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना – २०२४ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोडखुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांसारख्या आवश्यक उपकरणांची खरेदी करण्यासाठी एकरकमी ३००० रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या आणि आरामदायी जीवनासाठी महत्त्वाची ठरेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी श्रीगोंदा नगरपरिषद तर्फे येत्या २५ ऑगस्ट २०१४, रविवारी, श्रीगोंदा नगरपरिषद प्रशासकीय इमारत येथे अर्जांचे वितरण व स्वीकृती केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी निश्चित तारखेला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीगोंदा नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद, ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून, ही योजना त्यांच्या आरोग्य व जीवनाच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त ठरणार आहे. सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आवर्जून अर्ज दाखल करावा आणि त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे प्राप्त करावीत, अशी विनंती करण्यात येत आहे.

स्रोत:(श्रीगोंदा नगरपालिका)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading