महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा..

अहिल्यानगर दि. २३ जुन २०२५:

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,

अहिल्यानगर यांच्यामार्फत एक लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे.

सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून एक लाख रुपये थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. २ हजार ८५ रुपयांच्या नियमित ४८ समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही.

परंतु थकीत हप्त्यावर द.सा.द.शे. ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका, नगर-मनमाड रोड, अहिल्यानगर दुरध्वनी क्र. ०२४१-२९७०७०० येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading