आदिशक्ती अभियान राबविण्यासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे आयोजन करावे..

दिनांक ६ जुन २०२५,अहिल्यानगर:

राज्यात सन २०२५-२६ वर्षामध्ये आदिशक्ती अभियान राबविण्यात येणार असून या माध्यमातून ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात हे अभियान यशस्वीरित्‍या राबविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.

ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्त्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनपणे निवारण करणे, कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी सक्षम समाजनिर्मिती, लिंगभेदात्मक विचार सरणीला आव्हान देऊन किशोरवयीन मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढवून बालविवाहमुक्त समाजाचे निर्माण, लैंगिक, शारिरीक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटूंब व समाज निर्माण करुन अनिष्ट रूढींचे निर्मूलन करणे, महिला नेतृत्वाला सक्षम करत पंचायत राज पद्धतीचे महिलांचा सहभाग वाढविणे, महिला,

किशोरी यांना शिक्षण, रोजगार निर्णय व हक्क यामध्ये समान संधी निर्माण करुन शाासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधीच्या माध्यमातून आर्थिक उन्नत स्त्री संकल्पना राबविण्याच्या उद्देशाने आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे.

ग्रामसभेमध्ये महिला बचतगटातील सदस्य व महिला ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या ग्रामसभेमध्ये हिरिरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री. भंडारी यांनी केले आहे.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading