बालगृहात दाखल करण्यात आलेल्या ‘कृष्णा’नावाच्या बालकाबाबत माहिती देण्याचे आवाहन…

अहिल्यानगर, दि.२५- डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन संचलित मुला-मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आलेल्या ‘कृष्णा’ नावाच्या बालकाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी आवाहन केले आहे.

  संबंधित बालकाला श्रीगोंदा पोलीस स्टेशनमार्फत निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. सदर बालक एका व्यक्तीसोबत भिक्षेकर अवस्थेत आढळून आला होता. या बालकावर हक्क सांगणारे माता-पिता, पालक किंवा अन्य नातेवाईकांनी तातडीने अधीक्षिका श्रीमती पौर्णिमा माने यांच्याशी ७०२०१२४७७१ अथवा बाल संरक्षण अधिकारी सर्जेराव शिरसाठ यांच्याशी ९९२१३०७३०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading