दिनांक २४ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
बदलापूरसह देशातील विविध भागांत महिला आणि अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज श्रीगोंदामध्ये विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पुढाकाराने निषेध सभा व आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या समोर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आंदोलकांनी बॅनर लावले होते. पिढीतांना न्याय मिळावा या उद्देशाने आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध मागण्या मांडल्या.
या आंदोलनामध्ये बाळासाहेब गायकवाड, विशाल घोडके, विशाल जंजाळ, किरण गायकवाड, ऋषिकेश गोरे, रणजित शिरोळे, अक्षय रहिंज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाग घेतला. त्यांनी एकजुटीने महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध केला आणि न्यायाची भूमिका घेतली.
आंदोलनाचे आयोजन करणाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर आरोपींना योग्य शिक्षा झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. या वेळी उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले.
स्रोत:(आंदोलन)





