श्रीगोंदा: दोन मुलींच्या आईच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन..

दिनांक २५ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील मांडवगण रोड लगत गाडे मळा येथील शेतकरी दिलीप गाडे यांच्या पत्नी सौ. मीना गाडे यांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी श्रीगोंदा तालुक्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. दोन मुलींच्या आईसाठी मदत करण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबाने केले आहे. सौ. मीना गाडे यांना यकृताच्या गंभीर आजारामुळे तातडीने प्रत्यारोपणाची गरज आहे, आणि यासाठी 28 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

दिलीप गाडे यांनी आपल्या पत्नीच्या उपचारासाठी आधीच खूप आर्थिक तजवीज केली आहे, परंतु आता त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांवर पूर्ण खर्च झाल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. श्रीगोंदा तालुका तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सहृदय जनतेने या संकटसमयी मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा आहे.

करुणेच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना, आपली छोटीशी मदतही एका कुटुंबाच्या डोंगराएवढ्या संकटावर मात करण्यास मदत करू शकते. त्यामुळे सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मीना गाडे यांच्या उपचारांसाठी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन दिलीप गाडे व त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

मदतीसाठी बँक खाते तपशील:

– बँकेचे नाव: RBL बँक 
– खाते क्रमांक: 2223330049290240 
– खात्याचे नाव: मीना गाडे 
– IFSC कोड: RATN0VAAPIS 
– फोन पे नंबर: दिलीप गाडे – +919423802544 

मदत करणार्‍यांनी वरील तपशीलांचा वापर करून आपली मदत पाठवावी, अशी विनंती कुटुंबाने केली आहे.

स्रोत:(पत्रकार नितिन रोही)

जाहिरात…

Leave a Reply