श्रीगोंदा येथे युवासेना प्रवेश आणि पदनियुक्ती सोहळा; युवासैनिकांचा प्रचंड प्रतिसाद..

दिनांक श्रीगोंदा, २४ ऑगस्ट २०२४:

श्रीगोंदा येथे आज युवासेना (शिवसेना) प्रवेश कार्यक्रम आणि पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला युवासैनिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. अनिलशेठ शिंदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख श्री. सचिनभाऊ जाधव, महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रीमती. मीराताई शिंदे, आणि युवासेना जिल्हा प्रमुख श्री. अभिषेकराजे भोसले उपस्थित होते.

या सोहळ्यात श्रीगोंदा तालुक्यातील अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यासोबतच नवीन पदनियुक्त्याही करण्यात आल्या. नियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

१. निखिल ओव्हळ (जिल्हा संघटक)
२. हेमंत लोखंडे (उपजिल्हा प्रमुख)
३. मयुर राऊत (विधानसभा प्रमुख)
४. गणेश पिंपळे (तालुका संघटक)
५. अशोक लोखंडे (उपतालुका प्रमुख)
६. संदीप मदने (बेलवंडी गट प्रमुख)
७. गणेश शिंदे (मांडवगण गट प्रमुख)
८. महेश बेरड (चिचोंडी पाटील गट प्रमुख)
९. विशाल बनकर (उपतालुका प्रमुख)
१०. वैभव फडके (सोशल मिडिया तालुका प्रमुख)
११. वरद शिंदे (सोशल मिडिया विधानसभा प्रमुख)
१२. सार्थक गांजुरे (विद्यार्थी तालुका प्रमुख)
१३. आदित्य मखरे (विद्यार्थी शहर प्रमुख)

कार्यक्रमादरम्यान सर्व शिवसैनिकांनी आगामी विधानसभा, पंचायत समिती/जिल्हा परिषद, आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार केला.

या कार्यक्रमात नगरसेवक श्री. प्रशांतशेठ गोरे, श्री. संतोषशेठ कोथिंबीरे, श्री. निसारभाई बेपारी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री. संतोष शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख श्री. नंदकुमार ताडे, शिवसेना शहर प्रमुख श्री. नितीन गायकवाड, श्री. गणेश गांजूरे, आणि अल्पसंख्याक तालुका प्रमुख श्री. समीर काझी हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये श्री. निखिल ओव्हळ, श्री. हेमंत लोखंडे, श्री. मयुर राऊत, आणि युवासेना तालुका प्रमुख श्री. निलेश गोरे यांचा विशेष सहभाग होता.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading