मिराताई खेडकें यांची शिवसेना महिला आघाडीच्या श्रीगोंदा तालुका प्रमुखपदी निवड..

दिनांक २८ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वाढीला वेग आला असून, विधानसभा निवडणुकीतील यशानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातही अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या मिराताई खेडकें यांनी गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या मेहनतीची दखल घेत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिराताई शिंदे यांनी त्यांची श्रीगोंदा तालुका प्रमुखपदी नियुक्ती केली.

ही निवड जाहीर करण्यासाठी काल, २७ फेब्रुवारी रोजी शिवसेना उपनेते अजय बोरस्तेकर हे सभासद नोंदणी अभियानाच्या निरीक्षणासाठी आहिल्यानगर दौऱ्यावर आले होते. आहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात मिराताई खेडकें यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

या वेळी शिवसेना उपनेते अजय बोरस्तेकर, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन भाऊ जाधव आणि जिल्हा प्रमुख डॉ. शबनम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

नियुक्तीनंतर बोलताना मिराताई खेडकें म्हणाल्या, “स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंगीकारून मी पक्षवाढीचे कार्य करणार आहे. शिवसेनेची ध्येयधोरणे घराघरात पोहोचवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन.”

त्यांच्या या निवडीचे तालुक्यात विविध स्तरातून अभिनंदन होत असून, महिला आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading