दिनांक २३ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
हिंदू हृदय सम्राट, शिवसेना सर सेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे आयोजन श्रीगोंदा शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाबद्दल बोलताना, महिला जिल्हा प्रमुख मिराताई शिंदे यांनी म्हटले, “स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली नसती, तर महाराष्ट्रातील मराठी माणसाला लाचारी पत्करावी लागली असती. आज मराठी माणूस स्वाभिमानाने महाराष्ट्रात राहत आहे ते केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. त्यांच्या विचारांचा वारसा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन चालले आहेत, आणि प्रत्येक शिवसैनिकाने त्या विचारांचा आदर करावा.”

तसेच, तालुका प्रमुख नंदकुमार ताडे यांनी आपल्या भाषणात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात काम करण्याचा अनुभव व्यक्त केला. ते म्हणाले, “बालपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने आजपर्यंत शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांच्या काम करण्याची पद्धत व स्व. बाळासाहेबांचा हिंदुत्ववाद यामुळे शिवसेनेची ताकद वाढत आहे.” शिवसेना पक्षाच्या उज्वल भविष्यात विश्वास व्यक्त करत, त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, शहर प्रमुख, युवा शहर प्रमुख आणि महिलांसह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये नितीन गायकवाड, हृदय घोडके, मिराताई खेंडके, लिनाताई क्षीरसागर, संदीप भोईटे, समीर काझी, शिवा ताडे, हृतिक शिंदे, करणं गायकवाड, वैभव माने, अनिल सुपेकर, तुषार ढवळे, बाळासाहेब हिंगणे, इंदू ताई उदमले, वैभव क्षीरसागर, सूरज गायकवाड यांसारखे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत:(मिराताई शिंदे)


जाहिरात..
