हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९९ वी जयंती उत्साहात साजरी; ‘हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठान’ची स्थापना..

श्रीगोंदा, २३ जानेवारी २०२५:

शिवसेनेचे संस्थापक आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९९वी जयंती आज श्रीगोंदा शहरातील शिवाजी चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी रघुनाथ सूर्यवंशी, संभाजी घोडके, नूतन ताई पानसरे, सुदाम सावंत, सुरेश देशमुख, हरिभाऊ काळे, नितीन लोखंडे, संतोष चिकलठाणे, मयूर गोरे, जितू पाटोळे, जमील भाई शेख, योगेश भुतकर, राहुल नवले, महेंद्र मिसाळ, शिवाजी समदडे, काकासाहेब कदम, पत्रकार अमर घोडके, आणि चंदन घोडके यांसह अनेक शिवसैनिक, महिला पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रघुनाथ सूर्यवंशी यांनी केले. यावेळी शिवसैनिकांनी जयघोष करत बाळासाहेब ठाकरे यांचे समाजासाठी दिलेले योगदान आणि त्यांचे प्रेरणादायी विचार स्मरणात ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

हिंदुहृदय सम्राट प्रतिष्ठान’ची स्थापना
जयंतीच्या शुभमुहूर्तावर, सामाजिक कार्यासाठी ‘हिंदुहृदय सम्राट प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब दुतारे यांनी या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि समाजकार्य तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही संस्था कार्यरत राहील.”

या संस्थेसाठी शिवसैनिकांनी एकत्रितपणे निधी उभारणीसाठी पुढाकार घेतला. देणगी स्वरूपात ५७,१०१ रुपये निधी प्रतिष्ठानच्या खात्यावर जमा करण्यात आला. या निधीचा उपयोग सामाजिक उपक्रमांसाठी केला जाईल, असे अध्यक्षांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष करत उपस्थितांनी एकतेचे प्रतीक जपले आणि त्यांच्या कार्याचे स्मरण केले.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading