दिनांक ३ मार्च २०२५, श्रीगोंदा:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रीगोंदा तालुका व हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या तयारीसाठी समितीची बैठक आज, सोमवार, दिनांक ३ मार्च २०२५ रोजी संपन्न झाली. या बैठकीत उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे जेष्ठ नेते सुरेश देशमुख यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संभाजी घोडके, सचिवपदी रघुनाथ सूर्यवंशी, खजिनदारपदी नितीन लोखंडे, सहसचिवपदी शिवाजी समदडे आणि सहखजिनदारपदी संतोष चिकलठाणे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे, महिला आघाडी तालुकाप्रमुख नूतनताई पानसरे, तसेच हरिभाऊ काळे, रावसाहेब डांगे, निलेश साळुंके, अशोक पानसरे, संतोष सोनवणे, राजू तोरडे, शरद नागवडे, जमीलभाई शेख, सुदाम सावंत, जनाबाई गायकवाड, राहुल नवले, सुशांत भंडारी, गणेश लाटे यांच्यासह अनेक शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंती उत्सव उत्साहात व ऐतिहासिक थाटात साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन बैठकीत करण्यात आले. या निमित्ताने श्रीगोंद्यामध्ये विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्सवाच्या तयारीसाठी सर्व शिवप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)





Advertise..
