दिनांक १७ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांची आठवण जागवण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना पुनश्च महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा निश्चय सर्व शिवसैनिकांनी केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी श्रद्धांजली अशीच असेल.”

या कार्यक्रमात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अहिल्यानगर दक्षिण बाळासाहेब दुतारे, हरिभाऊ काळे, संभाजी घोडके, सुरेश देशमुख, रोहिदास मस्के, योगेश भुतकर, प्रवीण काळे, संतोष चिकलठाणे, दादाराम मस्के, भाऊसाहेब गोरे, शाकाल शोले, मयूर चव्हाण, महादेव ठोमस्कर, नुतन पानसरे, राजू तोरडे, ओमकार शिंदे, मयूर गोरे, सोमनाथ धोत्रे, बल्ली हेंद्रे यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(बाळासाहेब दुतारे)

