श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठानतर्फे सन्मान..

दिनांक ७ एप्रिल २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा येथील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध सण-उत्सवांचे काळात परिसरात शांतता व सौहार्द राखत अत्यंत कुशलतेने बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.

संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव, तिथीनुसार पार पडलेला शिवजयंती उत्सव, रमजान ईद, रामनवमी तसेच येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले जयंती या सर्व सण-उत्सवांचे वेळेस पोलीस प्रशासनाने घेतलेले योग्य नियोजन, दक्षता आणि कार्यक्षमतेमुळे वातावरण उत्साही आणि शांततेत पार पडले. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा प्रतिष्ठानच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.

या वेळी हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दुतारे, चंदन घोडके, सुरेश देशमुख, (पत्रकार)अंकुश तुपे, संभाजी घोडके, शिवाजी समदडे, मयूर गोरे, (पत्रकार)अमर घोडके, नितीन लोखंडे, हरिभाऊ काळे, सागर खेडकर, सुशांत भंडारी, राजू तोरडे, गणेश लाटे, रघुनाथ सूर्यवंशी, जमीलभाई शेख, रोहिदास म्हस्के तसेच प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading