“श्रीगोंद्यात अवैध धंद्यांसाठी पोलीस आणि या नेत्याची परवानगी अनिवार्य..!” सर्वत्र अवैध धंद्यांचा कळस.. श्रीगोंदा तालुका धुऊन खाणाऱ्या पोलिसांचा बघा प्रताप..

दिनांक २१ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत सध्या अवैध धंद्यांनी थैमान घातले असून, या सर्वावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्थानिक पोलीस प्रशासनासोबत एका बड्या नेत्याचा हस्तक्षेप असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. गुटखा विक्री, मटका, वेश्या व्यवसाय आणि ताडी हातभट्टी अशा अनेक अवैध धंद्यांचे जाळे पसरले असून, यामागे ‘नेताजींचा हात’ असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

कोण आहे हा बडा नेता?

श्रीगोंद्यात सामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांमध्ये या प्रश्नाची चर्चा आहे. अवैध धंदे चालवण्यासाठी स्थानिक पोलीस आणि या नेत्याशी सलगी ठेवणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडी नागरिकांसमोर जाहीर होत असताना, संबंधित नेत्याने अवैध व्यावसायिकांकडून वसूली करून स्वतःचा फायदा करून घेत असल्याचे बोलले जात आहे.

वेश्याव्यवसायातही नेत्याची भूमिका स्पष्ट.?

एका स्थानिक व्यावसायिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, वेश्याव्यवसाय सुरू ठेवण्यासाठी या नेत्याने स्वतःहून त्याला हप्ता मागितल्याचे सांगितले आहे. यामुळे पोलिसांसोबतच हा नेता या सगळ्या प्रकारात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची कार्यपद्धती पूर्णतः अपयशी ठरल्याचे चित्र आहे. अवैध व्यवसाय थांबवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बाहेरून आलेले अधिकारी श्रीगोंदा तालुक्यातील स्थितीचा गैरफायदा घेत असून, स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर गदा आणत लोकांची आर्थिक लुट केली जात असल्याचा आरोप होत आहे.

त्यातच पोलीस प्रशासनासह हा नेताही अवैध धंद्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याने सामान्य नागरिकांची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. या नेत्याच्या प्रतापामुळे पोलिसांवरचा विश्वास उडत चालला आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading