पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात: चारचाकीच्या धडकेत श्रीगोंद्यातील एक ठार, एक गंभीर जखमी..

दिनांक २१ जानेवारी २०२५, इस्लामपूर, श्रीगोंदा:

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात अनिल देविदास गव्हाणे (वय ३८, रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला, तर शरद जाधव (रा. आढळगाव) हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची घटना इस्लामपूरजवळ पेठ हद्दीतील एका कंपनीसमोर घडली. राजेंद्र वसंत पवार (रा. इटकरे) यांच्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला (एमएच ०९, के ५५४९) चारचाकी (एमएच १२, यू एन ८७३६) गाडीने पाठीमागून जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रॉलीचे चाक निखळून पडले आणि गाडीतील अनिल गव्हाणे यांचा जागीच मृत्यू झाला.

इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला आहे. चालक शरद जाधव यांच्यावर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

जाहिरात..

Leave a Reply