श्रीगोंदा (दि. १७ एप्रिल २०२५):
श्री शेत्र भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी म्हातारपिंपरी (ता. श्रीगोंदा) येथील भैरवनाथ मंदिर परिसरात प्रहार दिव्यांग संघटना व प्रेरणा अपंग सेवाभावी संस्था, अहमदनगर शाखा, श्रीगोंदा यांच्या वतीने श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. विलासराव खंडेराव वाबळे यांचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्याचे अध्यक्षस्थान म्हातारपिंपरी गावचे माजी सरपंच प्रकाश साहेबराव सस्ते यांनी भूषवले. कार्यक्रमास सरपंच उपसरपंच परेश वाबळे, प्रहार दिव्यांग संघटनेचे खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र पोकळे, धान्य रेशन तालुका अध्यक्ष सतीश हिरडे, डॉ. सोमनाथ देवकाते, सुरेश गलांडे, सिराज शेख, बलभीम हिरडे, बापू रंधवे, सचिन तोडकर तसेच इतर दिव्यांग मित्र व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात रमजान शेख यांनी विशेष शुभेच्छा देऊन आपली सदिच्छा व्यक्त केली. दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक सन्मान वृद्धिंगत करणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



Advertise..
