नवीन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांचा पदभार स्वीकारताना प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे सन्मान..

दिनांक १० मार्च २०२५ अहमदनगर:

जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. पंकज आसिया यांनी आज पदभार स्वीकारला. यानिमित्त, प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रेरणा अपंग सेवा संस्था, श्रीगोंदा यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या हस्ते डॉ. आसिया यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माननीय लक्ष्मण पोकळे व राजेंद्र पोकळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला कर्मचारी संघटनेचे डॉक्टर सोमनाथ देवकाते, पोपटराव शेळके, विजया हजारे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading