श्रीगोंदा, दिनांक २३ एप्रिल २०२५:

श्रीगोंदा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, आज झालेल्या अधिकृत बैठकीत त्याची यादी पुन्हा एकदा वाचून दाखवण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:

- अनुसूचित जाती: १०
- अनुसूचित जमाती: ०५
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): २१
- सर्वसाधारण प्रवर्ग: ४६
- एकूण पदे: ८२

या आरक्षण प्रक्रियेबाबत कोणास काही शंका किंवा हरकत आहे काय?, याबाबत उपस्थितांना विचारणा करण्यात आली. मात्र, कोणाकडूनही काही हरकत नोंदवण्यात आली नाही.

त्यानंतर पुढील टप्प्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गामध्ये महिलांसाठी ५०% आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रक्रिया २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता, सामाजिक सभागृह, पंतनगर, श्रीगोंदा येथे उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise..
