श्रीगोंदा तालुका भारतीय बौद्ध महासभेची नवी कार्यकारणी जाहीर; शांताराम उबाळे अध्यक्षपदी…

दिनांक २८ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:

भारतीय बौद्ध महासभेची श्रीगोंदा तालुक्याची नवीन कार्यकारणी नुकतीच लिंपणगाव येथील जेतवन बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात जाहीर करण्यात आली.

या निवडीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा सरचिटणीस सतीश ओहोळ, जिल्हा कोषाध्यक्ष विजय हुसळे, तसेच उपाध्यक्ष भगवंत गायकवाड, किशोर कांबळे, गोरख केदारे, बलभीम जावळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडली.

या कार्यकारिणीत श्री. शांताराम उबाळे यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी आबासाहेब राजपूत, कोषाध्यक्षपदी राष्ट्र भूषण घोडके, कार्यालयीन सचिवपदी नवनाथ रामफळे, तसेच हिशोब तपासणीस म्हणून भारत आल्हाट यांची निवड झाली आहे.

याशिवाय, विविध पदांवर पुढील निवडी करण्यात आल्या:

  • संस्कार उपाध्यक्ष: गोरक्ष ओहोळ
  • प्रचार पर्यटन उपाध्यक्ष: पंडित कांबळे
  • संरक्षण उपाध्यक्ष: हर्षल अडबडले
  • संस्कार सचिव: प्रमोद जाधव व शांताराम थोरात
  • संरक्षण सचिव: संतोष पठारे व सोमनाथ पवार
  • प्रचार पर्यटन सचिव: अनिल उबाळे
  • संघटक: अमोल कांबळे, ज्ञानेश्वर डाळींबे, राहुल छत्तीसे, महेश पवार, दादाभाऊ पंडित

कार्यक्रमात नवनियुक्त अध्यक्ष श्री. शांताराम उबाळे यांनी आपल्या भाषणात बहुजन समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध महासभा ही एक व्यापक लोकचळवळ घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीचे श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसुडे, सरचिटणीस पत्रकार डॉ.अमोल झेंडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक साधना ओहोळ, केंद्रीय शिक्षक प्रशांत चव्हाण सर आदी मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading