श्रीगोंद्यात रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन; पोद्दार स्कूलच्या प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी..

दिनांक २५ ऑगस्ट श्रीगोंदा:

श्रीगोंदा येथील पोद्दार स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी महापुरुषांच्या पोस्टर प्रतिमेबाबत प्राचार्य शहा यांनी कथितरित्या केलेल्या अपमानकारक वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २४ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)च्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड यांनी केले. आंदोलनकर्त्यांनी प्राचार्य शहा यांनी या प्रकरणी लिखित स्वरूपात माफी मागावी, त्यांचे निलंबन करावे तसेच श्रीगोंदा येथील पोद्दार स्कूलची शिक्षण विभागाने मान्यता रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सचिन घोडके, तालुका अध्यक्ष बाप्पूराव भोईटे, नाना सांगळे, अजित भोसले, वसंत सकट यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, संबंधित वक्तव्याबाबत योग्य ती चौकशी करून प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल.. असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला.

स्रोत:(आंदोलन)

Leave a Reply