श्रीगोंदा : हिरडगाव व ढवळगाव येथील गौरी शुगर ने ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव lबोत्रेपाटील यांचे मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांना मोफत साखर वाटपाचा शुभारंभ ओंकार शुगर ग्रुपचे संचालक प्रशांत बोत्रेपाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना टनेज प्रमाणे मोफत साखर . तसेच कारखान्यातील प्रत्येक कामगाराला १० किलो साखर व आकर्षक साखर बॅग मोफत दिली जाणार आहे.
कारखान्याची तांत्रिक कामे पूर्ण झाली असून लवकरच गळीत हंगाम सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी गौरी शुगरला ऊस पुरवठा करावा, असे आवाहन प्रशांत बोत्रेपाटील यांनी केले.
यावेळी सचिन चौधरी, आबासाहेब कोल्हटकर, दादा बनकर वसंत चरमळ, खांडेकर प्रदीप पवार उपस्थित होते.
