दिनांक २४ नोव्हेंबर २०२६,श्रीगोंद:
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने संविधान दिनानिमित्त गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश डी. पी. शिंगाडे, श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. जयंत शिंदे यांनी दिली.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते. समाजामध्ये रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि तरूणांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबीरामध्ये पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ, नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था व संघटनांच्या पदाधिका-यांनी मोठया संख्येने सहभागी होवून रक्तदान करावे असे आवाहन आयोजक जिल्हा न्यायालय, श्रीगोंदा वकील संघ व तालुका विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
