दिनांक २४ नोव्हेंबर २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये आज घडलेल्या पोलीस हल्ला घटनेनंतर पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा आणून पोलीस कर्मचारी संग्राम जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला

वैद्यकीय तपासणी (मेडिकल) आणि जबाब नोंदवण्यासाठी ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५३ नुसार, अर्थात सध्याच्या भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शासकीय कामात अडथळा आणणे आणि लोकसेवकावर हल्ला करणे यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असतानाच, आरोपी नेमका कसा निसटला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.?

दरम्यान, ताब्यातील आरोपी पसार झाल्याबाबत पोलिसांना विचारणा केली असता, आरोपीला केवळ कायदेशीर नोटीस बजावायची होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या विधानामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आरोपी खरोखरच ताब्यातून निसटला की..? पोलिसांनी स्वतःच्या किंवा आरोपीच्या बचावाची भूमिका घेतली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेमुळे श्रीगोंदा परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)

Ad..
