#श्रीगोंदा: आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला; पोलीस नाईक संग्राम जाधव बालबाल बचावले..!

दिनांक २४ नोव्हेंबर २०२६, श्रीगोंदा:

गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसावर संशयित आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज घडली आहे.

Ad..

या हल्ल्यात श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संग्राम जाधव हे जखमी झाले असून सुदैवाने ते या हल्ल्यातून बालबाल बचावले आहेत.

Ad..

मिळालेल्या माहितीनुसार, IPC 306 या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेत पोलीस कर्मचारी व त्यांचे पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवत पोलीस नाईक संग्राम जाधव यांना दुखापत केली.

Ad..

घटनेनंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपीची पुढील चौकशी सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सानप करत आहेत.

Ad..

जखमी पोलीस नाईक संग्राम जाधव यांच्यावर श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

Ad..

त्यांना गंभीर दुखापत नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र, कर्तव्यावर असताना झालेल्या या प्राणघातक हल्ल्यातून ते थोडक्यात बचावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Ad..

Leave a Reply