दिनांक १४ नोव्हेंबर २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थनगर भागात काल रात्री (दिनांक १३ नोव्हेंबर) अडीच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने अमोल राहुल घोडके यांची नवीन ‘सुझुकी बर्गमन’ (Suzuki Burgman) ही दुचाकी जाळल्याची खळबजनक घटना घडली आहे.

पीडित अमोल घोडके यांनी माध्यमांशी बोलताना याप्रकरणी काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कसून तपास सुरू केला आहे.

अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची पडताळणी करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)

Ad..
