दिनांक १३ नोव्हेंबर २०२६, श्रीगोंदा:
एकूण ऊसदर प्रतिटन ३,३०० रुपये, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ओंकार ग्रुपची शेतकरीहिताला प्राधान्य देणारी भूमिका..
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. युनिट ४, श्रीगोंदा या कारखान्याने ऊसबिलाचा दुसरा हप्ता प्रतिटन २०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. यापूर्वी अदा केलेल्या प्रतिटन ३,१०० रुपयांसह आता कारखान्याचा एकूण ऊसदर प्रतिटन ३,३०० रुपये झाला आहे.

या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून, कारखान्याच्या या कृतीचे परिसरातील शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, त्यांना आर्थिक नियोजन करता यावे आणि कारखाना व शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.

कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली समूहाने साखर उद्योगाच्या विस्ताराबरोबरच शेतकरीहिताला विशेष महत्त्व दिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा साखर कारखान्याच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याने त्यांना योग्य ऊसदर देणे आणि देय रकमेची वेळेत पूर्तता करणे ही समूहाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

कारखान्याच्या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार, कामगार आणि अधिकारी कर्मचारी या सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे. या सर्व घटकांमध्ये समन्वय राखत कारखान्याचे कामकाज अधिक सक्षम करण्यावर समूहाचा भर आहे.

दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन २०० रुपये जमा झाल्याने युनिट ४ चा एकूण ऊसदर प्रतिटन ३,३०० रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला असून, कारखान्याच्या शेतकरीकेंद्रित कार्यपद्धतीबद्दल सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य आणि विश्वास हीच कारखान्याच्या यशाची खरी ताकद असून, भविष्यातही शेतकरीहिताला प्राधान्य देत कारखान्याची प्रगती साधण्याचा ओंकार ग्रुपचा प्रयत्न राहणार आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
