दिनांक २२ सप्टेंबर २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्याविरोधात आणण्यात आलेला अविश्वास ठराव १७ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाल्यामुळे त्यांना आपल्या सभापतिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

दत्तात्रेय पानसरे यांच्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील आणखी एका बड्या नेत्याला राज्यस्तरीय पदावरून पायउतार व्हावे लागल्याने श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब नाहाटा यांच्याविरोधातील अविश्वास ठराव १७ विरुद्ध शून्य अशा मतांनी मंजूर झाला…,संघाच्या एकूण २१ संचालकांपैकी १७ संचालक बैठकीला उपस्थित होते. बाळासाहेब नाहाटा यांच्यासह संदीप काळे, बाबा पाटील आणि मनीष दळवी हे चार संचालक अनुपस्थित राहिले..

संचालक अंकुश आहेर यांनी अविश्वास ठराव मांडला, तर पोपटराव सोनवणे यांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित सर्व १७ संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बाळासाहेब नाहाटा सध्या अटकेत आहेत. या पार्श्वभूमीवर संचालकांनी एकत्र येऊन त्यांच्याविरोधात हा अविश्वास ठराव आणला होता.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
