दिनांक २० सप्टेंबर २०२६ श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील कामठी गावात मानवी संवेदनेला काळीमा फासणारी अत्यंत अमानवीय घटना घडली आहे. रस्त्यावरून जात असताना मोटरसायकलसमोर कुत्रे आल्याने झालेल्या किरकोळ वादातून एका नराधम भावाने आपल्याच सख्या चुलत भावावर कुऱ्हाड, लोखंडी गज आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला.
या नराधमांनी केवळ मारहाणच केली नाही, तर पीडिताच्या तोंडात बांबू घातला आणि बघ्यांची गर्दी घटना बघत राहिली आणि तब्बल तासभर हल्लेखोराने त्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू दिले नाहीत. या भीषण हल्ल्यात चुलत भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित इसम मोटरसायकलवरून जात असताना अचानक त्याच्या गाडीसमोर कुत्रे आले, ज्यामुळे त्याची मोटरसायकल खाली पडली. या किरकोळ कारणावरून संतापलेल्या चुलत भावाने मनात राग धरला. आणि ज्याचे कुत्र आहे त्याच्या घरी जाऊन त्याच्यावर निर्दयपणे प्राणघातक हल्ला केला.
संतप्त झालेला आरोपी आपल्या घरातील लोकांना एकत्र करून हातात कुऱ्हाड, लोखंडी गज आणि काठ्या घेऊन थेट सख्या चुलत भावाच्या घरी गेला. तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्या इसमावर बेदम मारहाण केली, त्याच्या तोंडात बांबू घातला आणि जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे, गंभीर जखमी झाल्यानंतरही तब्बल तासभर त्याला उपचारापासून रोखून धरण्यात आले.

या अमानवीय घटनेमुळे कामठी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर पिडित व्यक्तीला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
