श्रीगोंदा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य; प्रशासकीय दुर्लक्षामुळे DM.. DC आणि ठेकेदारातील भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण..!

दिनांक १३ सप्टेंबर २०२६ श्रीगोंदा:

महाराष्ट्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि संतश्रेष्ठ गाडगेबाबांच्या विचारांचा विसर पडल्याचे चित्र श्रीगोंदा बस स्थानकात पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा बस स्थानक सध्या अस्वच्छता, दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य यामुळे त्रस्त झाले असून प्रवाशांचे हाल होत आहेत. असे असतानाही आगार व्यवस्थापक श्री. भापकर यांनी या प्रकाराकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

बस स्थानकातील या दयनीय स्थितीमुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत असतानाच, दुसरीकडे स्वच्छता ठेकेदार, आगार व्यवस्थापक (DM) आणि विभागीय नियंत्रक (DC) यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. स्थानकात अस्वच्छतेचा कळस गाठला असतानाही संबंधित अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने, ठेकेदार, DC आणि DM यांच्यात काही ‘अर्थपूर्ण संबंध’ (आर्थिक हितसंबंध) तर नाहीत ना? अशी चर्चा सध्या श्रीगोंदा शहरात जोरदार सुरू आहे.

https://link.amazon/B0iKjDdX9

बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था झालेली असतानाही जिल्हा आगार व्यवस्थापक (DM) आणि विभागीय नियंत्रक (DC) या संपूर्ण प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, ज्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संशय बळावला आहे.

ठेकेदार नियमानुसार साफसफाई करत नसतानाही आणि स्वच्छतेवर लाखो रुपयांचा निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात मात्र घाणीचे साम्राज्य कायम असणे, यावरून ठेकेदार आणि अधिकारी यांच्यातील आर्थिक हितसंबंध उघडपणे समोर येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

श्रीगोंदेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेवर वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply