पांढऱ्या बगळ्यांनो.. खबरदार, महानोरांच्या केसाला जरी हात लावाल तर..

तर महाराष्ट्रात तुम्हाला राहायला घर उरणार नाही आणि सांगायला डीएनए…! लक्षात ठेवा गाठ, आमच्या मावळ्यांशी आहे.

दिनांक १२ जानेवारी,पुणे:
उस्मानाबादेत  दि.१० पासून (शुक्रवार) ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ‘संमेलनाला जाऊ नका’, अशी धमकीच ब्राह्मण महासंघाने ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने ब्राह्मण महासंघाला इशारा दिला आहे. ‘धमकी’ देणाऱ्या ब्राह्मण महासंघाच्या पांढऱ्या बगळ्यांनो..महानोर सरांच्या केसाला जरी हात लावला ना…तर महाराष्ट्रात तुम्हाला राहायला घर उरणार नाही आणि सांगायला डीएनए…! लक्षात ठेवा गाठ, आमच्या मावळ्यांशी आहे.’ अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.
संमेलनाध्यक्ष अमान्य, साहित्य संमेलनाला जाऊ नका; महानोरांना दिली धमकी..
संमेलनाध्यक्षांची निवड आम्हाला मान्य नाही, असे म्हणत संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष असणाऱ्या ना. धों. महानोर यांना करण्यात आले आहे. ‘साहित्य संमेलनाला जाऊ नका’, अशी धमकीच ब्राह्मण महासंघाने ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांना दिली आहे. याची तातडीने दखल घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ पोलिस संरक्षणाचे आदेशही दिले आहेत.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाध्यपदी निवड झाल्यानंतर समाजातील काही गटांनी त्याला विरोध केला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, महानोर यांना कोणी धमकी दिली याची चौकशी पोलिसांना करण्यास सांगितलं आहे. तात्काळ पोलिस संरक्षण देण्याचे संबंधित जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सांगितलं असल्याचं ते म्हणाले. यासंबंधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महानोर यांनी संमेलनाला जाऊ नका, असं पत्र आल्याचं मान्य केलं. पण तरीही ते उस्मानाबादला दाखल झाले आहेत.
महानोर म्हणाले, “ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या नावाने पत्र आले आहे. फादर दिब्रेटो यांची निवड सर्वानुमते झाल्याचं मी त्यांना सांगितले. त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही, असे सांगितल्यावरही त्यांचे उस्मानाबादला जाऊ नका सांगणारे फोन आले.”
(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading