दिनांक ११ मे २०२४, श्रीगोंदा:
अहमदनगर (अहिल्यानगर) लोकसभा मतदार संघातील महायुतीतील मित्रपक्षांचे उमेदवार डॉ.सूजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांची जाहीर सभा संत शेख महमंद बाबा पटांगण येथे आयोजित करण्यात आली. या जाहिर सभेचे अध्यक्ष बबनराव पाचपुते हे होते.
यावेळी आम. बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, विक्रम पाचपुते, सुवर्णा पाचपुते, मिराताई शिंदे, संदीप नागवडे, भगवान पाचपुते, बाळासाहेब महाडिक, नंदु ताडे, बाळासाहेब नाहटा, मिलिंद दरेकर, शहाजी हिरवे, दत्ता पानसरे, रमेश गिरमकर, बाबुशेठ टायरवाले, भानदास बेरड, शुभाष शिंदे, अशोक खेंडके, बापू गोरे, सुनिल दरेकर, राजु उकांडे, शरद नवले, छायाताई गोरे, दत्तात्रय हिरनावळे, राजा जगताप सोबत बहुसंख्य लोक उपस्थित होते..
मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या सभेत मोठा खोळंबा झाला आणि सभेत उपस्थितीत लोकांनी पावसात मिळेल तेथे आश्रय घेतला.. यावेळी डॉ सुजय विखे यांनी हातात माईक घेऊन भर पावसात सभेला संबोधित केले.. त्यांनी उस्थिताना मतदान करण्याचे आवाहन केले. पाऊस शुभ संकेत असल्याचे विक्रम पाचपुते यांनी नमुद केले.. आणि सदरील सभा संपन्न झाली आहे.
कमी वेळेत अनेक मुद्दे हाताळण्याचा डॉ विखे आणि विक्रम पाचपुते यांनी प्रयत्न केला..
विक्रम पाचपुते:
सभेच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावल्याने हे तर, विजयाचे शुभ संकेत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, श्रीगोंद्याला पाणी मिळाले नाही. मात्र पावसाने ही कमतरता दुर केल्याचे त्यांनी नमुद केले.
डॉ सुजय विखे:
पुन्हा मला संसदेत पाठवण्याचे काम मतदार संघातील लोकांनी करावे. सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध राहील. असे स्पष्ट केले.. गुंड शाही, पोलिसाना दडपशाही, जिलेटीन लावणाऱ्या उमेदवाराला त्याची जागा दाखवा. असेही त्यांनी म्हटलें.
मात्र, पावसाची आणि वादळाची तीव्रता वाढल्याने सभेतील उपस्थित जनसमुदाय आश्रय स्थळी पोहचले.. आणि सभा संपन्न झाली.
स्रोत:(जाहीर सभा)

