दिनांक ३ मे (कोळगाव,श्रीगोंदा):
कोळगाव येथील अपंग शेतकरी योगेश सुदाम दळवी यांचे चार दिवसापुर्वी छप्पराचे घर जळाले आणि संसाराची राखरांगोळी झाली.दळवी यांचा मोडलेला संसार उभा करण्यासाठी मदतीसाठी हात सरसावले आहेत.शनिवारी तहसीलदार महेंद्र महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली.
या कुंटुबांत अग्नीपंख फौंडेशन सुरुवातीला ५ हजाराची मदत जाहीर केली.त्यानंतर हेमंत नलगे प्रहार संघटना, शिवप्रतिष्ठान यांनी प्रत्येकी ५ हजारांची मदत देऊ केली.नितीन नलगे यांनी १० हजार योगेश दळवी यांचे वर्गमित्रांनी २६ हजार ची मदत दिली आहे.
तहसीलदार महेंद्र महाजन यांनी भेट दिली. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक दिलीप काटे, सतिश लगड, शुभांगी लगड, पत्रकार गणेश कविटकर, पत्रकार योगेश, पत्रकार चंदन गणेश गाडेकर सुनील दळवी उपस्थित होते.
कोळगाव येथील योगेश दळवी यांचे जळीत ग्रस्त घराची पाहणी करताना, (तहसीलदार) महेंद्र महाजन, दिलीप काटे, शुभांगी लगड, सतिश लगड आदि दिसत आहेत.
