प्रहार संघटनेतर्फे कोळगाव येथील पीडित कुटुंबाला मदत…

दिनांक ३ मे (कोळगाव,श्रीगोंदा):

दिनांक १ मे रोजी कोळगाव नाहेरमळा येथे योगेश सुदाम दळवी यांच्या घरातील गॅस सिलेंडर फुटुन,राहत्या घराला आग लागून संसार उपयोगी वस्तु जळून नष्ट झाल्या. कोरोना आप्पत्ति बरोबरच ओढवलेल्या या संकटाने  नमूद शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

सदर माहित मिळताच नामदार बचुभाऊ कडू यांच्या कार्यप्रेरनेणे व (प्रहार वारकरी संघटना प्रदेशाध्यक्ष) अजय महाराज बारस्कर ,(प्रहार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्याक्ष) संतोषजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , (प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष) विनोद (भाऊ) परदेशी व (दिव्यांग क्रांति आंदोलन जिल्हाध्यक्ष) राजेंद्र पोकळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

प्रहार संघटनेच्या वतीने सदर कुटुंबास ५००० रुपये रोख  व समाजकल्याण विभागाकडुन येत्या ८ दिवसांत १,५०,००० रूपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, तालुका कृषि अधिकारी व जिल्हा कृषि अधिकारी यांच्याशी चर्चा करुन जळालेल्या डाळिंबाच्या झाडांची तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिलेत.

यावेळी उपाध्यक्ष,सुरेश गलांडे, शाखाध्यक्ष मिठु मेजर, जि.प. सदस्य हेमंत नलगे, उपसरपंच नितीन नलगे, तसेच प्रहार संघटनेचे, गुलाब आढाव, किसन गुंजाळ, संपत नलगे, गणेश हराळ, ज्ञानेश्वर आढाव, दत्ता शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading