दिनांक ८ फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा/सोलापूर:
“शेतकरी जगला पाहिजे आणि त्याच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे,” या भूमिकेवर ठाम राहत ओंकार शुगर ग्रुपने चालू गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
ग्रुपच्या सर्व युनिट्समार्फत ५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, शेतकऱ्यांना तब्बल १२७० कोटी रुपयांची ऊस बिले अदा करण्यात आली आहेत.

सन २०२५-२६ हंगामात एकूण ५० लाख मे. टनाचे उद्दिष्ट साध्य., शेतकऱ्यांच्या खात्यात १२७० कोटी रुपये पूर्णतः वर्ग., काट्यावर अचूक वजन आणि सर्वोच्च ऊस दर देण्याची परंपरा कायम.
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी या विजयाचे श्रेय पारदर्शक व्यवस्थापन आणि आधुनिक यंत्रसामग्रीला दिले आहे.

“शेतकऱ्यांचा ऊस ही आमची जबाबदारी” या भावनेतून काम केल्यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली आहे. केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण केल्याबद्दल परिसरातून ग्रुपचे कौतुक होत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
