दिनांक ३० ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
ओंकार शुगर ग्रुपच्या हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीजच्या तिसऱ्या गाळप हंगामाचा ‘बाॅयलर अग्निप्रदीपन’ व ‘गव्हाण पूजनाचा’ कार्यक्रम बुधवारी उत्साहात पार पडला.
रायगड जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया पाटील, ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील, रेखा बोत्रेपाटील यांच्यासह ११ शेतकऱ्यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला.

जयंत पाटील यांनी बाबुराव बोत्रेपाटील यांचे कौतुक करताना ते शेतकऱ्याचा मुलगा असून त्यांनी बंद पडलेले १६ साखर कारखाने चालवण्यास घेतले असल्याचे सांगितले. या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक भाव दिला असून, त्यांची नियत चांगली आहे.

यंदा १ लाख मेटन ऊसाचे गाळप करून ओंकार शुगर ग्रुप देशातील नंबर एकचा शुगर ग्रुप ठरेल, याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला.
त्यांनी साखर कारखानदारीत केवळ पैसा नव्हे, तर चालवण्याची अक्कल आणि शेतकऱ्यांचे भले व्हावे ही भावना महत्त्वाची असल्याचे मत मांडले.

बाबुराव बोत्रेपाटील यांनी गेल्या वर्षी गौरी शुगरने ऊसाला ₹ ३१०१/- भाव आणि शेतकऱ्यांना साखर दिली असल्याची माहिती दिली. यंदाच्या हंगामातही ऊसाच्या भावात एक पाऊल पुढे राहण्याची ग्वाही दिली.
शेतकरी डोळ्यासमोर ठेवून ओंकार शुगर ग्रुपची स्थापना झाल्यानेच १६ कारखाने चालू झाल्याचे त्यांनी सांगितले.

जनरल मॅनेजर रोहीदास यादव यांनी यंदा नऊ लाख मेटन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी दररोज ९ हजार मेटन गाळप करणार असल्याचे सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांना प्राधान्याने ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Ugaoo Rat Trap Cage | Humane, Reusable Rat Catcher with 3-Door Design | Permanent Solution for Rats for Home, Garden, Kitchen
यावेळी अशोक नागरी सहकारी बँकेचे चेअरमन श्री प्रकाश मथुरिया, संतोष बोत्रे, विश्वासराव शितोळे, वैभवराव तावरे, नवनाथ फराटे, शिल्पा कुडापणे, माऊली पाचपुते, मारुती औटी, संपत दरेकर, टिळक भोस, अमोल दरेकर, सचिन चौधरी, संजय घाडगे, रवींद्र मोरे, बाळासाहेब वाबळे, शरदराव बोत्रे, माऊली जगताप, धनजय बोत्रे, आणि प्रविण बोत्रे हे उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
