दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:
बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेलवंडी आणि माठ परिसरात घोड व हंगा नदीच्या पात्रात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ९५ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन, तयार दारू आणि साहित्य जागीच नष्ट केले असून, सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बेलवंडी आणि माठ गावातील काही इसम नदीपात्राच्या लगत हातभट्टीची दारू तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती बेलवंडी पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या पथकाने घोड आणि हंगा नदीच्या पात्रात सापळा रचून धाड टाकली.

यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू तयार करण्याचे साहित्य आणि कच्चे रसायन जप्त करून त्याचा नाश केला.
पोलिसांनी या प्रकरणी १. दीपक भास्कर पवार (रा. माठ), २. रामदास प्रकाश पवार (रा. माठ), ३. अंकुश तानाजी पवार (रा. माठ), ४. संतोष तानाजी पवार (रा. माठ), ५. संजय शंकर पवार (रा. बेलवंडी), ६. गोरख पांडुरंग पवार (रा. बेलवंडी) या इसमांवर कारवाई केली आहे.
सदरची धाडसी कारवाई सपोनी नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार यमगर, आवटी, दहिफळे, महिला पोलीस नाईक सुरेखा वलवे, पोलीस कॉन्स्टेबल फिरोज तांबोळी आणि विनोद पवार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
